पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भाग १० - ऋषभ

आजच्या जमान्यात वेळेचा आणि नात्यांचं एक... अम्... विशेष नातं आहे (लहानपणी भाषेचा विशेष जरा कच्चा होता). तुमच्यासाठी कुठलं नातं किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही किती वेळात मेसेजचं उत्तर देता त्यावर ठरतं. आणि जसा-जसा वेळ जातो तसा-तसा तो सुरुवातीचा मेसेज यायला ही...अम्... वेळ लागतो (खरं सांगायचं तर भाषेचा विषय जास्तच कच्चा होता). मलाही थोडा वेळ आणि अंतर हवं होतं दोन वर्षांपूर्वी (आईन्स्टाईनची थिअरी ऑफ रिलेटीव्हीटी कळत नसली तरी टाईम अँड स्पेस किती महत्त्वाचे आहेत ते कळलं मला तेव्हा). माझ्याकडनं कुठलाही निर्णय सहजासहजी होत नाही. प्रत्येक निर्णयाच्या आधी त्याचं विश्लेषण होतं. असं केलं तर, तसं केलं तर अशा रिहर्सल्स होतात डोक्यात. पण मी मानसीला जेव्हा प्रपोज केलं तेव्हा यातलं काहीही घडलं नाही. अजूनही मला आश्चर्य वाटतं की मी मानसीचा होकार इतका कसा गृहीत धरला होता. अर्थात ती नाही म्हणू शकते हे माहीत होतं मला पण ती नाही म्हणेल याची मी कल्पनाही केली नव्हती. त्यामुळेच जेव्हा तिने तिचा अबोल नकार कळवला तेव्हा आधी म्हणल्याप्रमाणे गाढवा सारखं वाटत होतं मला. पुढ...

भाग ९ - गार्गी

मानसीच्या लग्नाची बातमी ग्रुप वर धडकल्यानंतर सगळ्यांनी तिला काँग्रॅच्युलेशन केलं. मी पण माझे दोन शब्द टाकले. नंतर तिने जेव्हा इन्व्हिटेशन कार्ड चा फोटो टाकला तेव्हा परत एकदा काँग्रॅच्युलेशन्स राउंड झाला. मला वाटलं होतं की लग्नाला कोल्हापूरला जाण्याचा सगळ्यांचा काही तरी बेत ठरेल पण तसं काही घडलं नाही. आता पहिल्यासारखा ग्रुप काही ॲक्टिव नव्हता. दोन वर्षात बरच काही बदललं होतं, बरच काही सांगायचं राहून गेलं होतं. सिंहगडच्या ट्रेक नंतर मला ग्रुपमध्ये ॲड करण्यात आलं -  व्हाट्सअप आणि ऑफिस दोन्हीकडे. जेवायला तरी मी अजूनही माझ्या आधीच्या मैत्रिणींबरोबर जात असले तरी ऑफिसमध्ये माझं स्टेटस आता प्रेशर राहिलं नव्हतं. सगळ्यांबरोबर संध्याकाळच्या चहाला जाणं, एकमेकांची थट्टा-मस्करी करत राहणे, गरज पडली तर दुसऱ्याची मदत करण्यासाठी स्वतःचं काम बाजूला ठेवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं - आयुषला शिव्या देणे हे माझ्या हळूहळू अंगवळणी पडलं होतं. ग्रुपचा हिस्सा झाल्यापासून ऋषभशीही बोलणं वाढलं होतं. त्या संध्याकाळी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपताना मनाच्या पटलावर उमटलेल्या भावनांची एक अस्पष्ट आठवण पुढचा महिनाभर ...

भाग ८ - मानसी

आरशासमोर बसलेली मी माझ्या प्रतिबिंबाकडे बघत होते. स्वतःकडे बघून हलकेच हसत होती. अंघोळ केल्यावर सुद्धा चेहऱ्यावरची हळदीची सुवर्णछटा अजून काही पूर्ण गेली नव्हती. उद्या येणाऱ्या सुखमय क्षणांची आजच्या हळदी समारंभात पाऊलखुणा दिसल्या होत्या. लग्नघर असल्यामुळे घरात काही ना काही गडबड चालूच होती. पाहुण्यांची कार्यक्रमाची तयारी, नातेवाईकांचे सल्ले, माझे मेकअप-कपडे, फोटोग्राफरच्या सूचना असं सगळा सकाळपासून कल्लोळ माजला होता. पण तरी सगळं कसं जुळून येऊन व्यवस्थित पार पडत होतं काय माहित. तसंही मला या गोष्टींची जास्त तसदी घ्यायची नव्हती. मला फक्त उद्याची वाट बघायची होती - लग्न समारंभाची - त्याच्याबरोबरच्या आयुष्याची. आपल्याकडे जशी बहुतेक लग्न ठरतात - तसंच माझंही ठरलं होतं - 'अॅरेंज्ड मॅरेज'. काम करता करता तीन वर्षे होऊन गेली होती. कामात मी सेटल झाले होते. घरच्यांनी माझ्याकडे लग्नाचा विषय काढला आणि मी माझी मंजुरी दिली. आयुष्यात जे काही मिळवायचं होतं ते ते मी बऱ्यापैकी मिळवलं होतं. मुळात माझ्या आयुष्याकडून अपेक्षा साध्याच होत्या. माझ्या आई-वडिलांना माझा अभिमान वाटावा असं करणं, मी जे काही काम करे...

भाग ७ - गार्गी

असह्य वेदना मला दुसरं काही सुचू देत नव्हत्या. पण तरीही कसंतरी सगळ्यांसमोर मी माझा 'ब्रेव्ह फेस' प्रेझेंट केला. माझ्यामुळे उगाच सगळ्यांचा मूड-ऑफ व्हायला नको म्हणून मी त्यांना राहिलेला गड फिरून येण्याचा आग्रह केला. पण मला कुणी सिरीयसलीच घेईना. सगळे माघारी जाण्याचं बोलू लागले. पण मी त्या जीप स्टॅन्ड पर्यंत कसं जाणार हा मोठा प्रश्न होता आणि हे कुणाच्या ध्यानीही येईना. मला नीट उभंही राहता येत नव्हतं, जीप स्टॅन्ड तर दूरच राहिलं. शेवटी ऋषभ ने सगळ्यांना समजावलं तेव्हा कुठे बाकी सगळे पुढे जाण्यासाठी राजी झाले. ऋषभ मला कंपनी देण्यासाठी माझ्याबरोबर थांबला. "थँक यू माझ्याबरोबर इथे थांबण्यासाठी." "अरे थँक यू कशाला? हे तर माझं कर्तव्यच आहे ना." ऋषभ मिश्किल हसत म्हणाला. "थँक यू यार. तू चांगला फ्रेंड आहेस." "अरे फ्रेंड्चं सोड, मी तुझा 'कूल सर' आहे ना... म्हणून कर्तव्य. फ्रेंडशिप तर कुणीही निभावतं." "हो का? थँक यू मग सर." "काय ग, असा कसा तुला एवढा मोठा खड्डा दिसला नाही?" त्या छोट्याश्या खळग्याकडे इशारा करत ऋषभ ने विचारल...

भाग ६ - ऋषभ

सकाळचा माझा अत्यंत कर्कश गजर वाजला. ताड्कन मी बेडवर उठून बसलो. काल थोडा सावधच झोपलो होतो त्यामुळे उठल्यानंतर नेहमीसारखं दोन मिनिटं 'मैं कहाँ हूँ?' अशी अवस्था आज झाली नव्हती. एरवी वीकेण्डला गजर न लावता झोपणारा मी आज मात्र सात वाजताच उठून बसलो होतो. नऊ वाजता शनिवारवाड्यावर पोहोचायचं होतं. सगळ्यात आधी मानसीला मेसेज केला - "GM". मला माहित होतं की ती खरं तर आधीच उठली असेल. पण मी उठलोय वेळेवर हे तिला कळवायचं होतं. तिचं झालं की ग्रुप वर आधीच काही लोकांचे आलेले मेसेज वाचून तिकडे ही मी उगवल्या ची पावती दिली. आता तयारीला लागण्याआधी एक शेवटचं काम राहिलं होतं - गार्गीला कॉल. साधारण पाच रिंग वाजल्यानंतर गार्गीने फोन उचलला. "हॅलो गार्गी, उठलीएस का तू?" "हो १५ मिनिट झाले." "अरे वा! एवढ्या सकाळी लवकर उठशील असं वाटलं नव्हतं." थोड्याशा मिस्कील आवाजात बोललो मी तिला. "आता सरांनी सांगितलंय तर ऐकलं पाहिजे ना." तिने पण बरोबर मला टोला लगावला. कुणी मला सर म्हटलं की विशीत साठी गाठल्यासारखं वाटतं. "हो का? मला नव्हतं माहित एवढी आज्ञापालक विद्यार्थिनी ...

भाग ५ - गार्गी

मूवी चा नुकताच इंटरवल झाला होता. प्रिया - माझी रूममेट -  पॉपकॉर्न आणायला चालली होती. मी माझी कॅरॅमेल पॉपकॉर्न ची फर्माईश तिला आधीच सांगितली होती. पॉपकॉर्न शिवाय मूवी बघण्याची मजाच येत नाही, नाही का? प्रिया परत येईस्तोवर मोबाईल चेक करावा म्हणून मी पर्स मधून तो बाहेर काढला. नेहमीप्रमाणेच फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्सॅप चे काही नोटिफिकेशन्स होते. इन्स्टा वरच्या माझ्या नवीन सेल्फी वर बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या. त्यांना आधी थँक्स रिप्लाय केला. फेसबुकच्या आजच्या चेक-इन वरही काहींचे लाइक्स आले होते. सगळ्यात शेवटी व्हॉट्सॅप उघडलं. पहिलाच मेसेज ऋषभ सरांचा होता, म्हणजे ऋषभचा होता. त्यांनी मला कित्येक वेळा सांगितलंय की सर म्हणू नकोस म्हणून. पण तरी अजून माझी सवय काही पूर्ण सुटली नव्हती. "हाय! गुड मॉर्निंग..." झाल्यानंतर त्यांनी कुठल्यातरी ट्रीपला येण्याविषयी विचारलं होतं. पण सगळं नीट समजायच्या आधीच आमची पॉपकॉर्न कन्या उगवली होती. ऋषभला नंतर मेसेज करायचा ठरवून मी प्रिया कडून माझा पॉपकॉर्नचा डबा घेतला. थोड्याच वेळात मूवी पण परत सुरू झाला. पुढचा तासभर तरी आता माझं पूर्ण लक्ष फक्त पडद्यावर ...

भाग ४ - मानसी

काही दिवस कसे एकदम चैतन्य घेऊनच येतात. आजचाही दिवस काहीसा असाच होता. गजर वाजायच्या पाच मिनिटांआधीच आज आपोआप जाग आली. उठल्यावर आळसाचा लवलेशही नव्हता. सकाळची आन्हिकं उरकून जवळच असलेल्या बागेत आज बऱ्याच दिवसांनी मॉर्निंग वॉक साठी गेले. सकाळच्या वाफाळत्या थंडीत मस्त फिरत होते बागेत मी. रोज येणारी लोकं आपला पहाटक्रम पूर्ण करण्यात मग्न होती. कुणी धावत होतं तर कुणी गप्पा मारत जलद चालत होतं. बागेच्या मधल्या मोकळ्या जागेत वयस्क लोकांचा एक घोळका हात वर करत हसत होता. मी मात्र आपल्याच धुंदीत फेरफटका मारत होते. शेवटी दमल्यावर बागेतल्याच एका मोकळ्या बाकड्यावर जाऊन बसले. शांत वाटत होतं एकदम. थोडावेळ तसाच गेल्यावर शेवटी उठले मी. आज शनिवार असल्यामुळे ऑफिसला जायची घाई नव्हती. पण तरी घरी तर जावंच लागणार होतं. घरी जायच्या वाटेच्या शेवटच्या वळणावर एक काकू भाज्या विकत होत्या. त्यांच्याकडनं एक हिरवीगार कोथिंबिरीची गड्डी घेतली. आज काहीतरी आवडीचं बनवून खाण्याचं मन करत होतं. मग तसंच आणखी थोडं पुढे जाऊन बेकरीतून पावही घेऊन आले. दुपारी पावभाजीचा बेत पक्का केला. नाष्ट्यासाठी पोहे बनवले, वरून आताच आणल...

भाग ३ - मानसी

आज खरं तर ऑफिसला निघायला उशीरच झाला. एकदा का उशिरा उठलं की मग सगळीच कामं कशी उशिरा आटोपतात. पण तरी काल बऱ्याच दिवसांनी चांगली झोप लागली रात्री. त्यामुळे उशीर झाल्याबद्दल काही वाटत नव्हतं. 'त्या' दिवसानंतर उठलेल्या विचारांच्या वादळाला कालच्या भेटीनंतर तूर्त विराम मिळाला होता. काल बऱ्याच दिवसांनी ऋषभ आणि मी पूर्वीसारखेच एकमेकांशी भेटलो होतो, वागलो होतो. पण आज एक नवा दिवस होता आणि आज परत ऑफिसमधे ऋषभ दिसणार होता. कालचा सहजपणा आज पण असेल, का मागच्या काही दिवसांपासून असणारी बोचट शांतता परत डोकं वर काढेल? आवरता आवरता 'त्या' दिवशीचे विचार परत मनात डोकावू लागले. मागच्या काही दिवसात जरी विचारांची गर्दी होती तरी त्या दिवशी मात्र मी पूर्ण विचारशून्य झाले होते. त्या अकस्मात प्रोपोसलचा धक्का एवढा होता की मी त्याला माझी बाजूही समजावू शकले नाही. आणि मग नंतर जेव्हा पण त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या हसऱ्या मुखवट्याला बघितलं, माझी हिम्मतच झाली नाही परत तो विषय काढण्याची. प्रत्येक मुलीच्या आपल्या जोडीदाराविषयी काही अपेक्षा असतात, तश्या माझ्याही आहेत. मुलगा मला समजून घेणारा अस...

भाग २ - ऋषभ

म्च! सोमवार! सोमवार सारखा दुसरा कुठला दिवस नाही आठवड्यात. सगळ्यांनाच नावडणारा - कुणाला शाळेत जावं लागणार म्हणून तर कुणाला कामाला. माझा मूड तर आज जरा जास्तच खराब होता. आज परत मानसीची भेट होणार, परत तिच्याशी बोलावं लागणार, बघूनही न बघितलसारखं करावं लागणार. हे तर सगळं होतंच पण यापेक्षाही जास्त कटकट वाटत होती आज येणाऱ्या फ्रेशर्स म्हणजे 'नवेकरी' यांची. त्यांना शिकवण्याचं काम माझ्या 'काबील पण कमजोर' अशा खांद्यांवर सोपवलं गेलं होतं आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स मी अजून तयार केले नाहीएत. आज खाव्या लागणारेत शिव्या त्या xxxxx आयुष कडून. बघू आता गेल्यावरच काय ते कळेल. लवकर आवरून आणि नाष्ट्याला कलटी मारून गाडीला हाकीत मी ऑफिसला लवकर पोहोचलो. लवकरच वर्ड डॉक्युमेंट उघडून आमच्या प्रोसेसचे सगळे स्क्रीनशॉट्स घेऊन त्यात पेस्ट करत होतो. काय 'जॉब सॅटिसफॅक्शन' चा अनुभव घेत होतो मी. चार वर्ष घासून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरींग मध्ये डिस्टींक्शन मिळवलं तेही चक्क पुणे विद्यापीठातून. पुणे विद्यापीठाचं वैशिष्ठ्य म्हणजे एकवेळ पाकिस्तान भारताला कश्मीर द्यायला तयार होईल पण पेपर मध्ये मार...

भाग १ - ऋषभ

रेस्टॉरेंट मधे पोहोचून अर्धा तास होत आला होता. तसं मला वेळेआधी येण्याची सवयच आहे. पण सध्या तरी ही सवय मला चांगलीच महागात पडत होती कारण बसल्या बसल्या काय करायचे म्हणून मी (कोल्ड) ड्रिंक रिचवत होतो. कोल्ड ड्रिंक घेण्यामागे आणखी एक कारण म्हणजे त्या दिवसानंतर आज आम्ही - म्हणजे ती आणि मी (आजच्या जमान्यात 'ती' आधीच स्पष्टपणे सांगावं लागतं माहीतर उगाच 'दोस्ताना' होते) - पहिल्यांदा भेटणार होतो. आता 'तो' दिवस तसा बहुतेकांच्या आयुष्यात येतो आणि तो प्रत्येकासाठी अविस्मरणीय असतो. कुणासाठी तो त्यांच्या आयुष्याचा सगळ्यात आनंददायी दिवस असतो तर कुणासाठी इंजीनीयर होऊन कॉल सेंटर मधे काम करण्यापेक्षाही भयानक असतो. अजून तरी 'ती' काही इतक्यात येण्याची शक्यता नाहीए म्हणून तोवर मी माझ्या 'त्या' दिवसाबद्दल थोडं सांगतो. तसं माझ्या गोष्टीत नवीन असं काही नाहीए. आम्ही दोघं एकाच कंपनीत काम करतो. काम करता करता मैत्री झाली. मैत्री जास्त घट्ट झाली आणि मला ती आवडायला लागली. आता आवडते तर खरं पण सांगावं कसं हे काही कळेना. सरळ तोंडावर सांगावं तर चार - चौघात आपल्या का...