भाग २ - ऋषभ
म्च! सोमवार! सोमवार सारखा दुसरा कुठला दिवस नाही आठवड्यात. सगळ्यांनाच नावडणारा - कुणाला शाळेत जावं लागणार म्हणून तर कुणाला कामाला. माझा मूड तर आज जरा जास्तच खराब होता. आज परत मानसीची भेट होणार, परत तिच्याशी बोलावं लागणार, बघूनही न बघितलसारखं करावं लागणार. हे तर सगळं होतंच पण यापेक्षाही जास्त कटकट वाटत होती आज येणाऱ्या फ्रेशर्स म्हणजे 'नवेकरी' यांची. त्यांना शिकवण्याचं काम माझ्या 'काबील पण कमजोर' अशा खांद्यांवर सोपवलं गेलं होतं आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स मी अजून तयार केले नाहीएत. आज खाव्या लागणारेत शिव्या त्या xxxxx आयुष कडून. बघू आता गेल्यावरच काय ते कळेल. लवकर आवरून आणि नाष्ट्याला कलटी मारून गाडीला हाकीत मी ऑफिसला लवकर पोहोचलो. लवकरच वर्ड डॉक्युमेंट उघडून आमच्या प्रोसेसचे सगळे स्क्रीनशॉट्स घेऊन त्यात पेस्ट करत होतो. काय 'जॉब सॅटिसफॅक्शन' चा अनुभव घेत होतो मी. चार वर्ष घासून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरींग मध्ये डिस्टींक्शन मिळवलं तेही चक्क पुणे विद्यापीठातून. पुणे विद्यापीठाचं वैशिष्ठ्य म्हणजे एकवेळ पाकिस्तान भारताला कश्मीर द्यायला तयार होईल पण पेपर मध्ये मार्क्स -- छे! अशक्य आहे ते! बरं असो, तर मी हे असं इंजिनीयरींग करून Ctrl+C, Ctrl+V असं एकदम टेक्निकल काम करत होतो. मोबाइलमधे साढे आठ वाजले होते. अजून बाकीच्यांना यायला तासभर तरी होता. भुकेने आतड्यांना पीळ पडत होता. आयुषला गंडवण्याइतपत तरी काम केलं होतं मी. म्हणून म्हणलं एक चहा घेउन यावा. ODC (Offshore Development Centre ) मधनं बाहेर पडलो आणि निघालो कॅन्टीन कडे. ODC असं हे कंपनीवाले उगाच फॅन्सी नाव देतात म्हणजे इतरांना सांगताना आम्हाला गर्व(?) वाटला पाहिजे. तसं पाहिलं तर हे अगदी एका गोठ्यासारखं आहे. फरक एवढाच आहे कि इथं म्हशींच्या ऐवजी आम्हाला दिवसभर बांधून ठेवलं जातं आणि दाव्याऐवजी आमच्या गळ्यात I-Card चा पट्टा असतो. म्हशींसाठी चाऱ्याची व्यवस्था गोठ्यातच केली जाते पण आम्हाला मात्र चारा खायला गोठ्यातनं बाहेर पडायला लागतं.
कॅन्टीनमधे चहा बरोबर एक बिस्कीट पुडा, एक प्लेट पोहे आणि वडा सांबार अशी हलकी न्याहारी करून मी परत आलो. ODCच्या दाराबाहेर एक मुलगी थांबली होती. मी I-Card स्वाईप करून आत आलो तशी तीही माझ्या मागे आत शिरली. मी आपल्या जाग्यावर जाऊन बसलो. थोडं इकडे तिकडे बघून झाल्यावर तिची नजर माझ्यावर स्थिरावली. माझ्यासमोर येऊन तिने तिच्या मधुर (आमच्यासारख्या जन्मोजन्मी बॅचलरपद नशिबी असलेल्यांना सगळ्याच मुलींचा आवाज मधुर वाटतो, मग तो मुलीच्या वेशात अमरीश पुरी का असेना) आवाजात विचारले, "Excuse me, Where does Ayush sit? Has he arrived yet?"
आयला! हे प्रकरण तर आपल्याच टीममधे आलेलं दिसतंय.
मनातल्या आवाजाकडे दुर्लक्ष करून मी जमेल तेवढ्या इंग्रजीत उत्तरलो - "He hasn't arrived yet. But he will be here shortly. Are you a new joiner in the PI team?"
ती मान होकारार्थी डोलवत म्हणाली "Yeah! Actually Ayush interviewed me two days back and I got a mail from the RMG that I have been selected for this project. Then Ayush mailed me to report today at 9:00am. He asked me to be on-time so I had to hurry to reach to office. I was sooo tensed that I'll be late and will get reprimanded on the first day itself. Thank God I'm here before anyone else."
तिचा रिपोर्ट ऐकत असताना मला तीन गोष्टी जाणवल्या -
१) किती ह**** आहे हा आयुष . टीम जॉईन करण्याआधीच याची धडधापटशाही चालू.
२) या पोरीची इंग्रजी आपल्यापेक्षा भारी आहे. हे असंच चालू राहिलं तर आपला जास्त वेळ निभाव लागणं शक्य नाहीए.
३) आणि सगळ्यात महत्वाचं - किती बोलते ही !!
"I am from the same team. You can have a seat here. What's your name by the way?" शेजारच्या खुर्चीकडे खुणावत मी म्हणालो.
"My name is Gargi Joshi."
"मराठी?" मी अपेक्षापूर्वक विचारलं.
"हो" नशीब हिच्या इंग्रजीच्या तडाख्यातून वाचलो.
"मी ऋषभ" स्मितहास्य करीत मी वदलो.
"Hi" ती म्हणाली.
"पुण्यातच राहतेस का?" मी विचारलं.
"सध्या पुण्यातच आहे पण माझं घर सोलापूरला आहे."
" ओह, ओके..."
आता इथून पुढे काय बोलावे हे काय कळेना. कुणीही नवीन व्यक्तीशी जास्त बोलणं जमत नाही आपल्याला. एवढ्या वेळ फडाफडा बोलणारी गार्गी पण गप्प झाली होती. कदाचित मला जाणवणारी विचित्रता तिलाही जाणवत असावी. अवघड शांततेला टाळण्यासाठी तिने तिचा फोन बाहेर काढला आणि त्यावर काहीतरी करत बसली. ४ - ५ मिनिटे असेच गेल्यानंतर माझ्या तल्लख मेंदूत एक नवीन प्रश्न येऊन दाखल झाला. वेळ न दवडता तो मी फायर केला. "गार्गी तू एकटीच सिलेक्ट झालीएस का टीममधे का आणखी कोणी आहे?"
"आहेत बहुतेक आणखी दोघेजण पण मला नक्की नाही माहीत. मेलमधे आणखी दोघांची नावं दिसली so I think ते पण सिलेक्ट झालेले असतील... पण ते अजून कसे नाही आले?
"आयुषने घेतला नसेल त्यांचा इंटरव्यू" मी पुटपुटलो.
तिला काही समजायच्या आधी मी म्हणालो "येतील येतील, कदाचित ट्रॅफिकमधे अडकले असतील."
अजून पण जवळजवळ आख्खं ऑफिस रिकामं होतं. आणि माझं काम अर्धच झालं होतं. त्यामुळे गार्गीला दुसऱ्या कुणाशी ओळखही करून देता येत नव्हती. शेवटी तिच्याकडे लक्ष न देता मी परत एम एस वर्ड वर तुटून पडलो.
पुढचा एक तास काय एकाग्रतेत गेला माझा. तंद्रीच लागली होती मला जणू. माऊसचे क्लीक्स आणि डोक्यातले विचार कसे एकदम लयीत पडत होते. या एका तासात KTचं बऱ्यापैकी काम उरकलं होतं मी. म्हणजे निदान आयुष कडून शिव्या न खाण्या इतपत उरकलं होतं. फालतूचं जरी असलं तरी काम पूर्ण करण्याचं समाधान होतं. ऑफिसमधली चलबिचलही आता वाढायला लागली होती. ऑफिस बसने येणारी मंडळी ताफ्याने ODC मधे घुसली होती. काही लोकं पीएमटी ने पण आली होती. या दोन प्रजातींना ओळखणं तसं फार अवघड नाहीए. ऑफिस बसने येणारी लोकं शांत चित्ताने ऑफिसमधे प्रवेशतात, जसे काही ध्यान-धारणा करून आलेत. आणि पीएमटी ने येणारे असे येतात जसे काही आंदोलन-धरणा करून आलेत. आमच्या ग्रुपची माणसं आणि मानसी अजून यायची होती. तोपर्यंत म्हणलं गार्गीशी बोलावं तर बाई अजून पण मोबाईलमधे डोकं घालून बसली होती.
"Hi... गार्गी?" थोड्या प्रश्नार्थक स्वरात मी तिला संबोधलं.
"Hi" डोकं वर करत, माझ्याकडे बघत ती उत्तरली.
"तू नाष्टा करून आलीएस का ?"
"नाही... वेळच नाही मिळाला. सकाळी लवकर यायचं होतं ना."
"ओके. चल मग नाष्टा करून येऊ. तुला कॅफेटेरिया पण दाखवतो."
"पण जर तोपर्यंत आयुष आला तर?"
'आयुष गेला खड्ड्यात' असं मनातल्या मनात आणि मनापासून म्हणलं मी.
"त्याला बहुतेक आणखी थोडा वेळ लागेल. आणि मला नाही वाटत नाष्टा करण्यासाठी तो तुला काही बोलेल."
टेबलावरची तिची बॅग, मोबाईल आणि मफलर... आपलं ते ... स्टोल उचलत ती माझ्या बरोबर निघाली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा