भाग ५ - गार्गी
मूवी चा नुकताच इंटरवल झाला होता. प्रिया - माझी रूममेट - पॉपकॉर्न आणायला चालली होती. मी माझी कॅरॅमेल पॉपकॉर्न ची फर्माईश तिला आधीच सांगितली होती. पॉपकॉर्न शिवाय मूवी बघण्याची मजाच येत नाही, नाही का? प्रिया परत येईस्तोवर मोबाईल चेक करावा म्हणून मी पर्स मधून तो बाहेर काढला. नेहमीप्रमाणेच फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्सॅप चे काही नोटिफिकेशन्स होते. इन्स्टा वरच्या माझ्या नवीन सेल्फी वर बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या. त्यांना आधी थँक्स रिप्लाय केला. फेसबुकच्या आजच्या चेक-इन वरही काहींचे लाइक्स आले होते. सगळ्यात शेवटी व्हॉट्सॅप उघडलं. पहिलाच मेसेज ऋषभ सरांचा होता, म्हणजे ऋषभचा होता. त्यांनी मला कित्येक वेळा सांगितलंय की सर म्हणू नकोस म्हणून. पण तरी अजून माझी सवय काही पूर्ण सुटली नव्हती.
"हाय! गुड मॉर्निंग..." झाल्यानंतर त्यांनी कुठल्यातरी ट्रीपला येण्याविषयी विचारलं होतं. पण सगळं नीट समजायच्या आधीच आमची पॉपकॉर्न कन्या उगवली होती. ऋषभला नंतर मेसेज करायचा ठरवून मी प्रिया कडून माझा पॉपकॉर्नचा डबा घेतला. थोड्याच वेळात मूवी पण परत सुरू झाला. पुढचा तासभर तरी आता माझं पूर्ण लक्ष फक्त पडद्यावर राहणार होतं.
मूवी संपल्यावर आमचा जवळच्याच एका मॉलमधे जेवायचा आणि शॉपिंगचा प्लान होता. फुड कोर्टमधे बरीच शोधाशोध केल्यानंतर आम्ही सिझलर्स घ्यायचे ठरवले. ऑर्डर येईपर्यंत मी ऋषभला मेसेज केला.
"हाय.."
"कुठली ट्रिप? कुठे जाणारे ट्रीपला???"
गरम-गरम सिझलर्स खाताना जिभेला चटके बसत होते. पण दमही निघत नव्हता. आमचं जेवण जवळपास आटोपलंच होतं. तोच मेसेजची रिंगटोन वाजली माझ्या फोनची. ऋषभचा रिप्लाय आला होता.
"आमचा ऑफिसचा जो ग्रुप आहे तो जाणार आहे... बहुतेक सिंहगडला जायचं ठरतंय... आर यू इंटरेस्टेड?"
जेवण झाल्यावर रिप्लाय करू असं ठरवून मी राहिलेले सिझलर्स गट्टम केले. प्रियाला कोल्ड कॉफी सुद्धा प्यायची होती. "माझ्यासाठी पण एक घेऊन ये प्लीज" असं एकदम गोडीत विनवलं मी तिला. नाक मुरडत का होईना पण गेली ती कॉफी आणायला. ती गेल्यावर मी मोबाईल अनलॉक केला आणि नोटिफिकेशन उघडलं.
"ह्म्म... साऊंड्स इंटरेस्टिंग... पण जायचंय कधी ते माहीत असल्याशिवाय नक्की नाही सांगता येणार..."
"मोस्टली नेक्स्ट संडेला जाऊ. नक्की ठरलं की कळवतो तुला...पण नेक्स्ट संडेसाठी तू तयार आहेस ना?"
"तसा तर काही प्लान नाहीए नेक्स्ट संडेचा. सो आय अॅम ओके विथ नेक्स्ट संडे."
"ठीक आहे. ठरलं तर मग... काही चेंज झालं तर सांगतो मी तुला..."
"ओके"
जेवण आटोपून आम्ही मॉलमधल्या औटलेट्समधे नवीन कपड्यांच्या शोधार्थ फिरू लागलो. प्रियाला काही टॉप्स घ्यायचे होते. मला पण काही आवडलं तर ते घेण्याचा बेत होता. पुढचा एक तास आमचा एक आउटलेट मधून दुसऱ्या आउटलेट मधे जाण्यामधे गेला. प्रिया एकदम मोटिवेटेड होती आज पण माझा काही मूड बनत नव्हता. एक मोकळा बेंच दिसताच मी तिथे जाऊन बसले. मगापासून एक गोष्ट मनात घोळत होती ट्रीप विषयी. आता स्वस्थ बसल्यावर ती स्पष्ट समोर आली. तसं तर ट्रीपला येणाऱ्या ऑलमोस्ट सगळ्यांना थोडंफार ओळखत होते मी. पण ऋषभ सोडून असं दुसऱ्या कोणाशी जास्त कनेक्ट नव्हता माझा. एकाच प्रोजेक्टमधे जरी असलो तरी त्यांचा असा एक वेगळा ग्रुप होता. मीही माझ्या ऑफिसमधल्या बाकी मित्र-मैत्रिणींमध्ये जास्त असायची. सो असं एकटं त्या सगळ्यांबरोबर जाणं थोडं ऑकवर्ड वाटत होतं. शेवटी मी ऋषभशी बोलायचं ठरवलं.
"हाय ऋषभ" मेसेज करून झाल्यावर मी मोबाईलवर टाईमपास करत बसले.
तोपर्यंत प्रियाने मला गाठलं.
"काय ग अशी इथे एकटी बसलीएस? ये ना माझ्याबरोबर टॉप चूज करायला."
"यायलाच पाहिजे का?" चेहरा कसातरीच करत मी विचारले. "अजिबात मूड नाहीए माझा. तसंही तुझी फॅशन सेन्स एकदम सही आहे. माझं ओपिनियन हवयच कशाला तुला?"
"एकटं कोण शॉपिंग करतं का गार्गी? चल ना प्लीज."
"बरं एक काम करू. तू पुढे जा आणि टॉप्स बघ. काही आवडलं तर मला फोटो पाठव. मी येईल मग लगेच. पण आता थोडं बसू दे. खूप पाय दुखताएत."
या कॉम्प्रमाईज वर प्रिया तयार झाली. तिच्या शॉपिंग सफारी वर ती पुढे एकटीच निघाली.
ऋषभचा तोपर्यंत रिप्लाय आला होता.
"हाय... बोल गार्गी."
"ट्रीप बद्दल थोडं बोलायचं होतं."
"ओके... बोल की मग."
"तुमचा पूर्ण ग्रुप जातोय ट्रीपला... पण मला यायला थोडं ऑकवर्ड वाटतंय."
"का ग? ऑकवर्ड वाटण्यासारखं काय आहे त्यात?"
"अरे म्हणजे तू सोडून मी जास्त कुणाला ओळखत नाही. मग तुमच्या ग्रुप ट्रिपमध्ये मी येऊन काय करू..."
"हे बघ मला ग्रुप वगैरे अशा गोष्टी नाही पटत... ज्या लोकांबरोबर आपण कम्फर्टेबल आहोत त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करावा... सो यू आर कॉर्डियली इंवायटेड...आणि मी आहेच तिथे... आणि मला नाही वाटत की त्यांनाही काही प्रॉब्लेम होईल तू येण्याने...सो बिनधास्त राहा..."
"ओके... म्हणजे बाकीचे लोक माईंड नाही करणार ना..."
"त्यांच्याकडे माइंड करण्यासाठी आधीच माइंड कमी आहे 🤣 त्यामुळे तू निश्चिंत रहा..."
"😂😂... ओके... डन मग..."
"कुठे आहेस सध्या?"
"मॉलमधे आलेय...असाच टाईमपास चाललाय...तू काय करतोएस?"
"मी पिक्चर बघतोय प्राईम वर... माझा आळस मला असा ऍक्टिव्ह टाइमपास करण्याची परवानगी देत नाही 😁"
"😆😆"
प्रियाचा एक मेसेज तोपर्यंत येऊन दाखल झाला होता.
"चल बोलू नंतर... माझ्या मैत्रिणीला थोडी मदत हवीए माझी."
"ओके... बाय... एन्जॉय युअर टाईमपास."
प्रियाने पाठवलेला टॉप खरंच खूप सही होता. आता मलाही थोडा हुरूप आला होता. बेंचवरनं उठत मी तिला कॉल लावला.
"हॅलो! मस्त आहे टॉप प्रिया. कुठे आहेस तू?"
"लाईफस्टाईलमधे एन्ट्री केली की राइट साइड च्या पहिल्या रोमधे."
"आलेच मी पण. बघू मला पण काही पसंत पडतंय का..."

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा