भाग ३ - मानसी
आज खरं तर ऑफिसला निघायला उशीरच झाला. एकदा का उशिरा उठलं की मग सगळीच कामं
कशी उशिरा आटोपतात. पण तरी काल बऱ्याच दिवसांनी चांगली झोप लागली रात्री.
त्यामुळे उशीर झाल्याबद्दल काही वाटत नव्हतं. 'त्या' दिवसानंतर उठलेल्या
विचारांच्या वादळाला कालच्या भेटीनंतर तूर्त विराम मिळाला होता. काल बऱ्याच दिवसांनी ऋषभ आणि मी पूर्वीसारखेच एकमेकांशी भेटलो होतो, वागलो होतो.
पण आज एक नवा दिवस होता आणि आज परत ऑफिसमधे ऋषभ दिसणार होता. कालचा सहजपणा आज पण असेल, का मागच्या काही दिवसांपासून असणारी बोचट शांतता परत डोकं वर काढेल? आवरता आवरता 'त्या' दिवशीचे विचार परत मनात डोकावू लागले. मागच्या काही दिवसात जरी विचारांची गर्दी होती तरी त्या दिवशी मात्र मी पूर्ण विचारशून्य झाले होते. त्या अकस्मात प्रोपोसलचा धक्का एवढा होता की मी त्याला माझी बाजूही समजावू शकले नाही. आणि मग नंतर जेव्हा पण त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या हसऱ्या मुखवट्याला बघितलं, माझी हिम्मतच झाली नाही परत तो विषय काढण्याची.
प्रत्येक मुलीच्या आपल्या जोडीदाराविषयी काही अपेक्षा असतात, तश्या माझ्याही आहेत. मुलगा मला समजून घेणारा असावा, माझ्या मताला किंमत देणारा असावा. माझ्या सुखा - दुःखात सहभागी होणारा असावा, माझ्या घरच्यांचा आदर करणारा असावा. पण खरं सांगायचं तर या गोष्टीविषयी मी आजपर्यंत कधी गांभीर्याने विचारच केला नाही. मुळातच मला बॉयफ्रेंड - गर्लफ्रेंड या नात्यावर विश्वासाच नाहीए. असं नाही की मला त्या नात्याचा तिरस्कार आहे पण काही गोष्टी असतात ज्या आपल्या स्वभावात बसत नाहीत आणि ही गोष्ट माझ्या स्वभावात बसणारी नव्हती.
माझं लहानपण एका अश्या कुटुंबात गेलं जिथे स्त्रियांना चूल आणि मूल या व्यतिरिक्त काही अस्तित्व नव्हतं. माझे आई-वडील ही जास्त शिकलेले नव्हते. घरचे वरिष्ठ आणि नातेवाईक माझ्या जन्मानंतर थोडे व्हिरमुसलेलेच असतील कारण कळायला लागल्यापासून मी त्यांचं वागणं बघत आलीए. आणखी स्पष्ट सांगायचं तर माझ्या मागून आलेल्या माझ्या भावाला आणि मला त्यांच्याकडून मिळालेल्या वागणूकीतली तफावत बघत आलीए. पण देवासारखे असलेले माझे आई-वडील माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. मला आणि माझ्या भावाला त्यांनी नेहमीच समान लेखलं. दोघांना पण शिकण्यासाठी पूर्ण प्रोत्साहन दिलं. जेव्हा शिक्षणासाठी मला हॉस्टेल वर राहण्याची परिस्तिथी आली तेव्हा डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू ठेवत मला जाऊ दिलं. मी पण त्यांना नेहमीच माझा गर्व वाटेल असंच वागत आलीए. कधी त्यांच्या विश्वासाला तडा जाईल असं काही केलं नाही. कॉलेज मध्ये असताना 'लव कल्चर' पासून स्वतःला अलिप्त ठेवलं. कारण कॉलेज माझ्यासाठी फक्त शिकण्याचे, किंवा आयुष्य एन्जॉय करण्याचं ठिकाण नव्हतं तर ते माझ्या पालकांचा माझ्यावरच्या विश्वासाचं प्रतीक होतं. माझ्यासाठी सोसलेल्या आर्थिक आणि मानसिक कष्टांची ती एक आठवण होती.
कॉलेज संपून मी जेव्हा नोकरीला लागले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी कधीच विसरू शकत नाही. तो आनंद चिरकाल राहील यासाठी जे जे शक्य आहे ते नेहमीच करेल असं तेव्हाच ठरवून ठेवलं होतं मी. जे नातेवाईक मला बघितले की नाक मुरडायचे ते आता कौतुक करताना थकत नव्हते. टोमण्यांची जागा आता टुमण्यांनी घेतली होती. ज्या कुटुंबाने माझ्या आई-वडिलांना नेहमीच सावत्र वागणूक दिली होती ते आता त्यांचा मानपान करू लागले. हे सर्व पाहून मीही सुखी होते.
नोकरी लागल्यापासून, शहरात माझी योग्यता दाखवत स्वतःच्या अटींवर आयुष्य जगत आहे मी. आणि त्यातलीच एक अट मी स्वतःलाच होती - अरेंज्ड मॅरेजची. मला अंदाज होता की घरचे जेव्हा पण माझ्यासाठी मुलगा बघतील तेव्हा त्यांच्या काय अपेक्षा असतील. आणि मला त्यांचा अपेक्षाभंग करायचा नव्हता. मला माझ्या पालकांवर पूर्ण विश्वास होता की ते जो पण जोडीदार माझ्यासाठी निवडतील तो माझ्यासाठी योग्यच असेल. आतापर्यंत समाजाशी भांडत ज्यांनी मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं ते वेळ येईल तेव्हा माझं पण मत विचारात घेत एक चांगला वर शोधतील. त्यामुळे असं कधी कुणाविषयी मी रोमँटिकली विचारच केला नाही.
मी या प्रोजेक्टला जॉईन झाले आणि लगेच काही लोकांशी माझी चांगली मैत्री झाली. आम्ही सगळे एकत्रच जॉईन झालो होतो आणि कामही सारखंच, त्यामुळे ओळखी व्हायला वेळ लागला नाही. पण आम्हा सर्वांना एकत्र अण्ण्यामागे ज्या व्यक्तीचा सिंहाचा वाटा होता तो म्हणजे आयुष. त्या हिटलर विरोधात आम्ही सगळे ऍक्सिस देश एकत्र आलो. आणि या हिटलरचा सगळ्यात प्रखर विरोधक म्हणजे ऋषभ. आयुष समोर तर बोलण्याचं कधी याचं धाडस झालं नाही पण कॅफेटरियामधे हा एकदा चालू झाला की हसता हसता वाट लागायची आमची. तसा तर नेहमीच काहीतरी बावळट कारनामे करत, PJ मारत हसवत राहतो पूर्ण ग्रुपला पण आयुषचा विषय निघाला की एकदम फॉर्म मधे येते गाडी याची. काम करत करत आणि आयुषचे ऑर्डर्स झेलत दीड वर्ष झाला. ग्रुप मधल्या सगळ्यांशी जरी एकदम मिळून राहत असले तरी ऋषभचं आणि माझं एका वेगळ्याच पातळीवर संधान जुळलं होतं. न सांगता दोघांनाही पुढचा काय विचार करतोय हे बरोबर समजायचं. त्याचे ते फालतू जोक, आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही माझ्या ओठातून निसटलेले हसू यांची चांगली यारी जमली होती. भांडायचो पण तेवढेच. त्याच्या प्रत्येक गोष्टीला हसण्यावारी नेण्याच्या स्वभावामुळे कधी कधी जाम राग यायचा. पुढच्या माणसाची काय स्थिती आहे, तो कुठल्या विचारात आहे याचं त्याला भानच रहायचं नाही. महाशय नेहमी आपलीच री ओढण्यात व्यस्त. पण कितीही हसत असला, कितीही बेफिकर वागत असला, तरी मी त्याची नाजूक बाजूही पाहिली होती. सहसा कधी कुणाला तो त्याच्या मनातलं जाणवून देत नसे पण त्याचं हळवेपण माझ्यापासून लपून राहिलं नव्हतं.
आणि आता त्याचीच चिंता वाटत होती. माझा निर्णय माझ्या तत्वांना धरून होता पण तो त्याच्या जिव्हारी पण लागणारा होता. या भावनांच्या वादळात आमची मैत्री कितपत टिकेल याचा काही भरोसा नव्हता. पण कालच्या भेटीनंतर आता थोडं हायसं वाटतंय. पहिल्यासारखं आम्ही निखळ वागू एकमेकांबरोबर हे कदाचित कधीच शक्य नव्हतं. पण निदान एकमेकांना पारखे होणार नाही याची मला खात्री पटली काल.
सगळं आवरून, दाराला कुलूप लावून मी बाहेर पडले. ऑफिसची बस कधीच निघून गेली होती. आज मग PMT मधेच प्रवास करावा लागणार होता. कसंतरी धक्के खात खात मी ऑफिसला पोहोचले. सकाळी घाईत निघाल्यामुळे नाष्टा करण्याचाही वेळ नव्हता मिळाला म्हणून सरळ आधी कॅफेटेरियात गेले. सॅंडविचची ऑर्डर देऊन रिकामी जागा बघतच होते की मला ऋषभ दिसला. आधी वाटलं नको जायला, पण मग वाटलं असं कधीपर्यंत त्याच्याशी लपाछपी खेळत राहणार. त्याच्यापर्यंत जाता जाता हृदयाचे ठोके वाढले होते. काय बोलायचं, कसं बोलायचं काही सुचत नव्हतं. ऑर्डर घेऊन मी त्याच्या टेबल पाशी जाऊन पोहोचले. त्याच्याबरोबर असणाऱ्या मुलीशी गप्पा मारण्यात गुंग असलेल्या ऋषभने माझ्याकडे बघितले. आज एकदम फ्री दिसत होता तो. त्याच्या चेहऱ्यावरचा तो सहज भाव बघून माझ्या मनावरचा ताणही कमी झाला. त्याने मग माझी आणि गार्गीची ओळख करून दिली.
"काय रे आज एकदम रिलॅक्स दिसतोएस तू? काय झालं?" मी विचारलं.
"जेव्हा माणूस काही काम करायचं ठरवतो ना, आणि तो ते काम पूर्ण करतो तेव्हा वाटणारा आनंद वेगळाच असतो. तोच आनंद दिसतोय तुला"
"अरे वा!! असं काय काम केलंस तू आज?"
"ते मी तुला नाही सांगू शकत"
"एवढं कुठल्या सिक्रेट प्रोजेक्टवर काम करतोएस? मला तरी कळू दे."
"सांगतो तुला नंतर." गार्गीकडे खुणावत तो उत्तरला.
"पण तू मला सांग, तुला का उशीर झाला एवढा आज?" त्याने विषय बदलत विचारले.
"मी पण सांगेल तुला नंतर" त्याच्याच शब्दांनी मी त्याला टाळलं.
माझा मोर्चा मग गार्गीकडे वळवत मी विचारले "काय मग गार्गी, कसा चाललाय तुझा पहिला दिवस?"
"आतापर्यंत तर चांगलाच चाललाय. पण पुढे कसं होतंय काय माहित."
"का ग? पहिल्या दिवसापासूनच पुढची चिंता?"
"चिंता अशी नाही. पण पहिलाच जॉब आहे ना, त्यामुळे थोडं टेन्शन आहे. काय काम आहे? काय करायचंय? याची अजून नीट कल्पना नाहीए. म्हणून थोडी anxiety वाटतेय."
बस्, ऋषभला मला चिडवायची संधी मिळाली. "अगं गार्गी, तू कशाला उगाच टेन्शन घेतेस? इथे मॅडम बसल्या आहेत, त्या एकदम एक्सपर्ट आहेत. तुला कधीही काहीही लागलं तर यांना कॉन्टॅक्ट कर. दिवस-रात्र एक करून त्या तुझी मदत करतील याची मला पूर्ण खात्री आहे. हो का नाही मॅडम?" मान हलवत, हलकसं हसत, ऋषभ बोलला.
"हो बरोबर बोललास ऋषभ तू. गार्गी तुला काहीही अडलं तर मला बिनधास्त विचार. तसंही या वेड्याला काही येत नाही."
ऋषभ च्या चेहऱ्यावरचं हसू विरलं.
"चला माझी अजून बेईज्जती होण्याच्या आधी इथून निघू."
आम्ही प्लेट काऊंटर वर ठेऊन परत ODC कडे निघत होतो. गार्गी ऋषभला काहीतरी विचारत होती. मी त्यांच्यापासून दोन पावले मागेच होते. मनातल्यामनात विचार करत की दिवसाची सुरुवात तर चांगली झाली फक्त आता राहिलेला दिवस पण असाच जावा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा