भाग १० - ऋषभ
आजच्या जमान्यात वेळेचा आणि नात्यांचं एक... अम्... विशेष नातं आहे (लहानपणी भाषेचा विशेष जरा कच्चा होता). तुमच्यासाठी कुठलं नातं किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही किती वेळात मेसेजचं उत्तर देता त्यावर ठरतं. आणि जसा-जसा वेळ जातो तसा-तसा तो सुरुवातीचा मेसेज यायला ही...अम्... वेळ लागतो (खरं सांगायचं तर भाषेचा विषय जास्तच कच्चा होता). मलाही थोडा वेळ आणि अंतर हवं होतं दोन वर्षांपूर्वी (आईन्स्टाईनची थिअरी ऑफ रिलेटीव्हीटी कळत नसली तरी टाईम अँड स्पेस किती महत्त्वाचे आहेत ते कळलं मला तेव्हा). माझ्याकडनं कुठलाही निर्णय सहजासहजी होत नाही. प्रत्येक निर्णयाच्या आधी त्याचं विश्लेषण होतं. असं केलं तर, तसं केलं तर अशा रिहर्सल्स होतात डोक्यात. पण मी मानसीला जेव्हा प्रपोज केलं तेव्हा यातलं काहीही घडलं नाही. अजूनही मला आश्चर्य वाटतं की मी मानसीचा होकार इतका कसा गृहीत धरला होता. अर्थात ती नाही म्हणू शकते हे माहीत होतं मला पण ती नाही म्हणेल याची मी कल्पनाही केली नव्हती. त्यामुळेच जेव्हा तिने तिचा अबोल नकार कळवला तेव्हा आधी म्हणल्याप्रमाणे गाढवा सारखं वाटत होतं मला. पुढ...